वरणगावात उद्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक


वरणगाव : भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक शुक्रवार, 18 रोजी वरणगाव येथे होत आहे. नागेश्वर मंदिर रोडवरील मराठा समाज मंगल कार्यालय येथे सायंकाळी वाजता होणार्‍या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैया पाटील असतील. या बैठकीला भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्य्क्ष रवींद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष अरविंद मनकरी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे.

पक्षाची रणनीती ठरणार
या बैठकीत कार्यकर्त्यांशी हितगुज साधून आगामी पक्षाची रणनीती ठरविण्यात येणार आहे.या बैठकीला सोशल डिस्टन्स ठेऊन सर्व प्रकारची खबरदारी घेऊन बैठक होणार आहे. या बैठकीला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, युवक शहराध्यक्ष प्रशांत मोरे, अल्पसंख्यांक विभागाचे पप्पू जकातदार, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गजानन वंजारी यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !