भुसावळात कांदा निर्यात बंदी निर्णयाचा निषेध


जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागातर्फे प्रशासनाला निवेदन

भुसावळ : केंद्र सरकारने जाहीर केलेली कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा भुसावळा बुधवारी निषेध करण्यात आला. या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागातर्फे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. प्रांत कार्यालयाती योगीता गोरडे यांच्याशी जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागातर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील भाजप सरकारने शेतकर्‍यांच्या कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, ईस्माईल गवळी, महेबूब खान, गफुर गवळी, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, कुणाल सुरळकर, विक्रम वानखेडे, सुजाता सपकाळे, सपना पगारे उपस्थित होत्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !