वरणगावातील मंजूर पाणीपुरवठा योजनेबाबत कार्यारंभ आदेश द्यावेत


 

राज्यपालांकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळेसह नगरसेवकांचे साकडे

वरणगाव : 13 सप्टेंबर 2019 रोजी भाजपा सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून तत्कालीन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगावकरांना 24 तास पाणी मिळावे यासाठी 25 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली होती. 5 जून रोजी निविदा मंजुरीसाठी तत्काळ सभा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने बोलाविली होती. सभेत उपनगराध्यक्ष शेख अखला, नगरसेविका माला मेढे, नगरसेविका मेहनाज पिंजारी यांनी वरणगावकारांना 24 तास पाणी मिळाले पाहिजे म्हणून पाणी योजनेच्या टेंडर मंजूर करा म्हणून लेखी मागणी सभेत केली मात्र इतर 12 नगरसेवकांनी नामंजूर केली त्याच दिवशी वरणगावकरांना 24 तास पाणी मिळाले पाहिजे यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वेळ न घालवता त्याच दिवशी 5 जून 2020 ला चौथ्यांदा वेळ न घालवता रीटेंडर काढले होते. त्यानुसार 1 टक्के कमी दराने 2 टेंडर आले आहे मात्र आज पर्यंत सुद्धा वर्क ऑर्डर दिली नाही. वरणगावकरांना 7 ते10 दिवस पिण्याचे पाणी मिळते त्यामुळे नागरीकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहे. चौथ्या वेळी आलेले रीटेंडर ओपन करून पाणी योजनेच्या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात यावा, असे साकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, नगरसेविका मेहनाज बी.इरफान पिंजारी यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त तथा संचालक वरळी, मुख्याधिकारी शामसुंदर गोसावी यांना देण्यात आल्या आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !