भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तक्रारदाराला परत केला मोबाईल
भुसावळ : अप 15018 काशी एक्स्प्रेसने रावेर ते जळगाव प्रवास करणार्या ऋषीकेश वसंता पांडव (हेडगेवार चौक, रावेर) यांचा नऊ हजार रुपये किंमतीचा मोबाईल भुसावळ आऊटरवर गाडी आल्यानंतर चोरीला गेला होता. 4 मार्च 2020 रोजी ही घटना घडली होती. अल्पवयीन संशयीताकडून हा मोबाईल 14 रोजी जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने नुकताच तो तक्रारदाराला परत करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मधुकर न्हावकर यांनी केेली.

