नोकर भरतीवर शासनाने आणू नये गदा


यावलमध्ये सकल मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन

यावल : शैक्षणिक वर्ष 2020-21 वर्षात मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता आगामी काळात मराठा आरक्षण नसलेली कोणतीही नोकर भरती होऊ न देण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी यासह मराठा आरक्षणांतर्गत भरती झालेल्या नोकर भरतीवर शासनाने गदा येवू देवू नये, अशी मागणी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या माध्यमातून सोमवारी येथील तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याकडे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती व राखीव पदे कायम राखली जाईल या विषयी सरकारने त्वरीत अध्यादेश काढावा, अशा आशयाचे निवेदन यावल तालुका सेल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजर पाटील, तालुका मराठा सेवा संस्थेचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नगरसेवक अतुल पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील तसेच छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत पाटील, दीपक पाटील, विलास पवार, सुनील गावडे, किशोर पाटील, दगडू पाटील, गणेश महाजन, निर्मल पाटील, मधुकर पाटील, संतोष पाटील, व्दारका पाटील आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !