पिंपळगाव बुद्रुकला कोरोनाचा शिरकाव : प्रशासकांनी केली पाहणी
वरणगाव : पिंपळगाव बुद्रुक येथील एका महिलेचा कोरोना पॉझीटीव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांनी गावाचे सर्वेक्षण करून तत्काळ उपाययोजना राबवल्या. पिंपळगाव बुद्रुक येथे गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्यानंतर गावात आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव नव्हता मात्र 52 वर्षीय महिलेला त्रास होत असल्याने जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली.
प्रशासकांनी केली पाहणी
ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर वायकोळे, ग्रामसेवक रतन बोदडे, माजी सरपंच सपना सरोदे, उषा सरोदे, बाबूराव सरोदे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी या परीसरामध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून घराच्या आजूबाजूला असलेल्या लोकांची टेस्ट करून घेतली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदार’ी या सर्वेक्षणात अंतर्गत पन्नास घरांचे दररोज सर्वेक्षण सुरू असून या परीसरात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेहत.


