वरणगाव शहरात 20 हजार झाडे लावणार : सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिननिमित्त शहरात वृक्षारोपण
वरणगाव : शहरातील मकरंद नगरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. वरणगाव शहरात 20 हजार झाडे लावण्यात येतील, अशी ग्वाही प्रसंगी वरणगावचे सहाय्यक निरीक्षक संदीप बोरसे यांनी दिली. वरणगाव शहरात वृक्षारोपणामुळे नागरीकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल, असे नगराध्यक्ष सुनील काळे आपल्या मनोगतात म्हणाले. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करून झाडे लावण्यात आली. प्रसंगी हाजी अल्लादीन सेठ, संजयकुमार जैन, सुनील माळी, ज्ञानेश्वर घाटोळे, हितेश चौधरी, संजय सोनार, वॉर्ड 16 मधील मकरंद नगरातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आकाश निमकर, भूषण कोलते, भूषण राजपूत, प्रकाश चौधरी, किरण पाटील, विशाल कुंभार, मंगेश कुंभार, संतोष कश्यप यांच्यासह असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते
यावलमध्ये फळ वाटप
यावल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, माजी शहराध्यक्ष बाळु फेगडे, डॉ.कुंदन फेगडे, किशोर कुलकर्णी, परीष नाईक, बबलु घारू, व्यंकटेश बारी, रीतेश बारी, योगेश चौधरी, रज्जाक पटेल आदींची उपस्थिती होती.


