जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 703 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 42 हजार 559 वर : 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी 703 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 42 हजार 559 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1061 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 31 हजार 503 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात तब्बल 801 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 103
जळगाव ग्रामीण 25
भुसावळ 49
अमळनेर 70
चोपडा 99
पाचोरा 30
भडगाव 20
धरणगाव 27
यावल 14
एरंडोल 65
जामनेर 93
रावेर 15
पारोळा 08
चाळीसगाव 27
मुक्ताईनगर 22
बोदवड 32
अन्य जिल्हा 04


