भुसावळातील आराधना कॉलनीतील बोगद्याचा प्रश्‍न मार्गी लावा


रेल्वे सल्लागार समिती सदस्य परीक्षीत बर्‍हाटे यांची रेल्वे प्रशासनाला साकडे

भुसावळ : भुसावळातील आराधना कॉलनीला जोडणार्‍या बोगद्याचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य परीक्षीत बर्‍हाटे यांनी नुकतीच वरीष्ठ मंडळ अभियंता राजेश चिखले (समन्वय) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात रेल्वे सेवा ठप्प असल्याने रेल्वेने अनेक ठिकाणी पुल, प्लेटफार्म तसेच अन्य दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली मात्र मंजूर असलेल्या बोगद्याच्या कामालाही वेग देण्याची गरज असल्याचे बर्‍हाटे यांनी सांगितले. मागणीच्या अनुषंगाने चिखले यांनी संबंधित विभागाला पुढील आठवड्यात कामाच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले. प्रसंगी नगरसेवक युवराज लोणारी, रमाशंकर दुबे व रेल्वेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !