रावेरात भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर


रावेर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त रावेर येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी 70 युवकांनी रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
रक्तदान शिबिराचे उद्घाटन जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रदेश किसान मोर्चा उ.मा.संपर्कप्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्षपद्माकर महाजन, लोकसभा संयोजक नंदू महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय धांडे, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस सी.एस. पाटील व महेश चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष रेखा बोंडे, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, रावेर कृउबा समिती सभापती श्रीकांत महाजन, पंचायत समिती उपसभापती जुम्मा तडवी, जि.प.सदस्य कैलास सरोदे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील, संदीप सावळे, भास्कर महाजन, गोपाळ नेमाडे, प्रसिद्धी प्रमुख नितीन पाटील, सेवा सप्ताह तालुकाप्रमुख भूषण पाटील, शहर युवा अध्यक्ष अजिंक्य वाणी, पुरोजीत चौधरी, सरपंच प्रमोद चौधरी, शुभम पाटील, नितीन पाटील, राजेंद्र पाटील, रोहन चर्‍हाटे, शुभम मुर्हेकर, सागर भारंबे, बाळा आमोदकर , गणेश भोई व भाजप व युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते. गोळवलकर रक्तपेढीचे शिबिराकामी सहकार्य लाभले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !