रावेरात किराणा दुकान फोडणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


रावेर : शहरातील गांधी मार्केटमधील किराणा दुकान फोडून साडे सात हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणारा संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरातील मानकर प्लॉट परीसरात राहणारे अशोक ग्यानचंद मुलचंदानी (60) यांचे महात्मा गांधी मार्केटमध्ये सुरज किराणा नावाचे दुकान आहे. 15 सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकान फोडून दुकानातील पाच हजार रुपये किंमतीचे बीडीचे बंडल, अडीच हजार रूपयांची चिल्लर असा एकूण सात हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

गोपनीय माहितीवरून आरोपीच्या आवळल्या मुसक्या
गुन्हा दाखल झाल्यानंतर रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी गोपनीय माहितीवरून आरोपी महेंद्र उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी (24, रा.नवीन निंबोल, ता.रावेर) याला अटक केली. ही कारवाई विभागीय पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक महेंद्र सुरवाडे, कॉन्स्टेबल सुरेश मेढे, तुषार मोरे, मनोज म्हस्के, भरत सोपे यांनी केली. याप्रकरणी तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !