डॉ. रवींद्र शुक्ला यांना बेस्ट क्लब प्रेसिडेंट पुरस्कार
भुसावळ : भुसावळातील डॉ.रवींद्र शुक्ला यांना रोटरी जिल्हा 3030 च्या वतीने बेस्ट क्लब प्रेसिडेंट पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईजमध्ये हा कार्यक्रम झाला. डॉ.शुक्ला यांना 2016 मध्ये सर्वोत्कृष्ट क्लब सेक्रेटरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे शिवाय त्यांच्या 366 रोटरी थॉट्स या पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट मोस्ट असामान्य अॅक्टिव्हिटी ऑफ द क्लब हा पुरस्कारही मिळाला आहे. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी हे पुस्तक लिहिले होते हे देखील विशेष! डॉ.शुक्ला यांना मिळालेल्या पुरस्कारानंतर रोटरी क्लब परीवारासह मित्र परीवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

