भुसावळात रस्त्याच्या दुरवस्थेने खड्ड्यांना हार घालत वाहिली श्रध्दांजली
यावल रस्त्याचे काम दोन महिन्यात खराब : खराब रस्त्यासाठी राष्ट्रवादी झाली आक्रमक
भुसावळ : गेल्या दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या यावल रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दोन महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामात मोठा गैरप्रकार झाला आहे. असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे रविवारी सायंकाळी यावल रस्त्यावर खड्यांना फुलांचा हार अर्पण करीत गांधीगिरी करीत सचीन चौधरी यांनी पालिकेची लाज काढली. शहरातील रस्त्यांवरील खड्डे जीव घेणे झाले आहे. त्यामुळे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे रविवारी सायंकाळी पाचला यावल रस्त्यावर बाजार समितीचे सभापती सचीन संतोष चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, आऊ चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर सचीन पाटील यांच्यासह पदाधिकारी यांनी यावल नाक्याजवळ जात रस्त्यावर पडलेल्या खड्याला नमस्कार करीत त्यास पुष्पहार घातला. यावेळी नगरसेवक पगारे, ठाकूर यांनी फुले अर्पण केली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यांची अवघ्या 60 दिवसात अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. मुरूमच्या ऐवजी काळी माती
टाकण्यात आल्याचा आरोप चौधरी यांनी केला. या रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी करीत दोन महिन्यात या रस्त्यांची अवस्था वाईट पालिकेकडून काहीही लक्ष दिले गेले नाही.
गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
पालिकेतील अनेक जण कमीशवर पोसले जात आहे. त्यामुळे पालिकेतील गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. रस्त रोको आदोलन जरी केले असले तरी कुणांचीही गैरसाय होऊ नये यासाठी बाजूने त्यांनी लहान वाहने जाऊ दिली. मात्र मोठी वाहने बाजूच्यामार्गाने गेली. रस्त्याला हार अर्पण करून उपस्थित सर्वच पदाधिकार्यांनी रस्त्याजवळ थांबून त्या ला श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी पालिका प्रशासन, ठेकेदार यांच्या मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्यात. अचानक झालेल्या या कार्यक्रमाने पोलिसांची मात्र एकच धावपळ उडाली. गांधी पुतळ्याजवळ होणारा हा कार्यक्रम थेट यावल नाक्याजवळ करण्यात आला.

प्रत्यक्ष कामाची केली होती पहाणी
ज्या वेळी या रस्त्याचे काम सुरू होते, त्यावेळी मी प्रत्यक्ष इंजीनिअर घेऊन येथे आलो होते, त्यावेळी काम निकृष्ठ सुरू असल्याचे सांगत हे काम थांबविण्याची मागणी केली होती, जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी सुध्दा केल्या आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून याबाबत काहीही हालचाली करण्यात आल नाही. यामुळे रस्त्याच्या कामातील गैरप्रकाराची चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे.
लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद
16 फेब्रवारीला काम सुरू असतांना आले होते, तक्रारी केल्या होत्या मात्र त्याकडे लक्ष दिले नाही, ज्यावेळी रस्ता तयार करण्यात आला,
त्यानंतर लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद होती, त्यामुळे वाहतूक नसतांना सुध्दा रस्ता खराब झालाच कसा असा प्रश्न उपस्थित करीत ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. पालिका प्रशासनाकडूनही गैरप्रकारावर पांघरून घातले जात आहे, असा आरोप केला.
प्रशासनाचे दुर्लक्ष
यावल रस्त्याच्या झालेल्याकामाकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही.
मुरूमाच्या ऐवजी काळी माती टाकली, अधिकार्यांनाही दाखविण्यात आली मात्र काहीही उपयोग झाला नाही, या गैरप्रकाराची साखळीच आहे, असा आरोप नगरसेवक उल्हास पगारे यांनी मनोगत व्यक्त करतांना केला.

