बोदवडमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा


बोदवड : बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगून म्हशींची वाहतूक करणार्‍या वाहन चालकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, 20 रोजी शहरातील जामनेर रस्त्यावर सकाळी आठ वाजेच्या सुमारास शहरातून आयशर (क्रमांक एम.एच.15 वाय.5209) मधून मुक्ताईनगरहुन बोदवडमार्गे मालेगावच्या बाजारात चालक मोहम्मद हनीफ कलाउद्दीन (32, रा.अमनपूर, ता.मालेगाव) हा म्हशी विक्रीसाठी नेत असताना शहराबाहेरील जामनेर रोडवर र्माबल दुकानासमोर दुचाकी (एम.एच.19 डी.ई.5955) व अन्य विना नंबरची दुचाकीवर तिघांनी गाडी आडवी लावत आम्ही बजरंग दलाची माणसे आहोत, तुमचे वाहन पांझरापोळ गो शाळेत लाव, असे सांगितले तसेच तुझ्या गाडीत म्हशी असल्याने आमच्या संघटनेला देणगी दे, असे सांगितल्याने त्यांना एक हजार रुपये दिले व त्याचवेळी तेथे पोलिस आल्याने झालेला प्रकार त्यांना सांगण्यात आला. त्यानंतर तीनही संशयीत आरोपींना बोदवड पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी नितीन रामा सुरवाडे (कोल्हाडी, ता. बोदवड), जयराज बसराज पवार (रा.आचेगाव, ता.भुसावळ) व प्रमोद सुकदेव बावस्कर (पिंपळगाव, ता.भुसावळ) यांच्याविरुद्ध मो.हनीफ यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विलास महाजन करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !