मी भाजपातच राहणार : माजी मंत्री एकनाथराव खडसेंची स्पष्टोक्ती
पक्षांतराच्या चर्चा निराधार : सव्वा दोन महिन्यांपासूनच आपण घरातच
मुक्ताईनगर : उत्तर महाराष्ट्रातील हेवी वेट असलेले मात्र भाजपावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला हे त्यास निमित्त ठरले ते सोमवारी मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीचे ! मात्र खडसेंनी पुन्हा या सर्व चर्चा निराधार असल्याचे सांगत आपण भाजपातच राहणार असल्याचा सांगितल्याने राष्ट्रवादी प्रवेशाच्या केवळ चर्चाच असल्याचे पुन्हा स्पषट झाले आहे.
राष्ट्रवादीची बैठक
राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू असून या बैठकीला गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील देखील उपस्थित आहेत. माजी मंत्री खडसे हे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी उघड केली आहे त्यामुळे ते अलीकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र मंगळवारीदेखील खडसेंनी पुन्हा एकदा आपण भाजपातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, सव्वा दोन महिन्यांपासून मी घरातच आहे त्यामुळे पक्षांतराचा विषय नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगत आलो आहे.


