विवाहिता अत्याचार प्रकरण : पतीचा पसार मित्रही जाळ्यात
जळगाव : जळगावातील महिला अत्याचार प्रकरणातील संशयित महिलेच्या पतीनंतर मंगळवारी त्याच्या मित्राला दुपारी एक वाजता शिताफीने वाल्मिक नगर परिसरातून रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. एक दिवसांपूर्वी पीडीतेच्या पतीला अटक करण्यात आली असून तो पोलिस कोठडीत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी पतीने त्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी रामनंद नगर पोलिसात महिलेचा पती व त्याचा मित्र या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 18 रोजी रात्री हा गुन्हा दाखल झाला व त्याच्या काही तासात रामानंद नगर पोलिसांनी तपासची चक्रे फिरविली असता आधी वाल्मिक नगरातील घरी पोलिसांनी चौकशी केली असता हा नराधम शिरपूर किंवा पुणे अशी दोन वेगवेगळी ठिकाणे लोकांकडून सांगण्यात आली. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे अखेर तो पुण्याला असल्याचे समोर आले. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी रामानंद नगरचे एपीआय संदीप पदेशी व पथक जात असताना अचानक तो नराधम पती जळगावात येत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. या पथकाने बस थांबत असलेल्या स्वातंत्र्य चौकात सापळा रचला व या ठिकाणी तो उतरताच त्याच्या मुसक्या आवळल्या व गजाआड केले होते. नराधम पतीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे.
पतीच्या मित्रालाही अटक
पीडीतेवर तिच्या पतीच्या मदतीने अत्याचार करणारा पतीचा मित्र हा पसार होता. पोलिसांना तो इंदोर येथे असल्याचे कळले होते. त्यानुसार त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. मंगळवारी दुपारी एक वाजता पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, तुषार विसपूते, रुपेश ठाकूर, होमगार्ड निकम यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून वाल्मिक नगर परिसरातून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.


