वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची द्यावी भरपाई


फैजपूर प्रांताधिकार्‍यांना निवेदन : पंचनाम्यांचीही अपेक्षा

फैजपूर : रावेरसह यावल तालुक्यात 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालयने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. उद्ध्वस्त पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी सावद्यातील हाजी हारून सेठ फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नाजिम शेख सलीम यांनी केली आहे.

या पिकांचे नुकसान
रावेरसह यावल तालुक्यात ज्वारीसह कापूस, भुईमूग, सोयाबीन, कांदा, मका, बाजरी, केळी, पपई, फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामेचे आदेश देऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रसंगी संस्थाध्यक्ष नाजीम भाई, इम्रान भाई, स्वप्निल कोल्हे, इमरान खान, राजीक सेठ, कादीर खान, अरमान तडवी, नईम मोबाईल, भूषण भोरटक्के आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !