यावलमध्ये राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थींना धनादेश वाटप
यावल : राष्ट्रीय अर्थसहाय योजनेंतर्गत तालुक्यातील सात लाभार्थींना आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते प्रत्येकी 20 हजारांप्रमाणे एक लाख 40 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. दारीद्य्र रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तिचे अकाली निधन झाल्याने शासनाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. तालुक्यातील सांगवी खुर्द येथील प्रमिला तुळशीराम कोळी, सुंनदा प्रकाश कोळी, यावलच्या प्रियंका प्रकाश फेगडे, आशा मुशीर पटेल, कासवे येथील सुंनदा संजय सोनवणे, भालोद येथील छाया सुनील कोळी, न्हावी प्र.यावलच्या दीक्षा किशोर इंगळे या लाभार्थींना धनादेश देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावल तहसील कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास तहसीलदार जितेंद्र कुंवर, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, कदीर खान, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, अनिल जंजाळे, संगांयोचे नायब तहसीलदार बबीता भुसावरे उपस्थित होते.


