राष्ट्रीय युवा परीषदेतर्फे दहावी-बारावीतील गुणवंतांचा सन्मान
भुसावळ : कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सार्वजनिक स्वरुपात झाला नाही मात्र जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परीषदेच्या माध्यमातून भुसावळ तालुका युवा परीषदेने फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परीक्षेत तालुक्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या 15 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच केला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा परीषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे यांच्यासह प्रमोदकुमार शुक्ल, राजेश महाजन, प्रतीक्षा पाटील, अनिल बाविस्कर, दिव्या भोसले, अविनाश जावळे, योगेश चौधरी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात तेजस पाटील, प्रा.सुनील नेवे, प्रमोदकुमार शुक्ल आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष आकाश इंगळे, उपाध्यक्ष गिरीश पाटील, महासचिव नोविता कोल्हे, सचिव रितेश भारंबे, तालुका समन्वयक रोहित पाटील, पूजा पाटील, तेजस्वी चौधरी आदींनी परीश्रम घेतले.


