दुचाकी अपघातात भुसावळातील तरुणाचा मृत्यू


भुसावळ : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर ती पुढे चालणार्‍या वाहनावर आदळून झालेल्या अपघातात भुसावळातील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री तापी नदीच्या पुलावर हा अपघात झाला. या अपघातात अक्षय मुरलीधर वारके (22, गंगाराम प्लॉट) या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र विकास साबळे (21) हा जखमी झाला आहे. दोघे मित्र अकलूज, ता.यावल येथे मित्राच्या वाढदिवसासाठी गेले होते तर रात्री परतीच्या प्रवासात तापी नदी पुलाजवळ पुढे चालणार्‍या वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने भरधाव दुचाकी वाहनावर धडकून अपघात झाल्याने अक्षयचा मृत्यू झाला तर विकास साबळे हा जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ हलवण्यात आले. दरम्यान, अक्षय हा भुसावळातील मुरलीधर वारके यांचा मुलगा असून त्याच्या पश्‍चात रुपेश व शुभम हे भाऊ असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !