कंडारीतील 20 वर्षीय युवकाची आत्महत्या


भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील 20 वर्षीय युवकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना 23 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. संकेत अनिल कांबळे (20, सम्राट कॉलनी) असे मयत युवकाचे नाव आहे. युवकाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. मंगळवारी सायंकाळी तापी नदी पात्रा नजीकच्या विहिरीत संकेतने उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना परीसरातील मुलांनी पाहता नागरीकांना माहिती कळविली. घटनास्थळी शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी दिली. मयत तरुणाच्या पश्‍चात आई, वडिल, भाऊ असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !