गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण, हेच आहे खरे मोदीजींचे शासन


जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांचा आरोप

भुसावळ : भारतीय रेल्वेतील 191 रेल्वे गाड्या व 109 रुटच्या खाजगीकरणाचा घाट मोदी सरकारने घातला असून या माध्यमातून देशातील लाईफ लाईनच विकण्याचं षडंयंत्र भाजप सरकार रचत असून जे भारतीय बांधवांनी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं त्यांना खाजगीकरण झाल्यानंतर तो मोबदला किंवा पेन्शन सुद्धा मिळणार नसल्याने त्यांना उतारवयात हालअपेष्टा सहन कराव्या लागतील व उरलेले आयुष्य हे रेल्वेच्या खाजगीकरणामुळे संपून जाईल, असा दावा जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी एका पत्रकान्वये केला आहे. गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण, हेच आहे खरे मोदीजींचे शासन असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला एका प्रसिद्धी पत्रकान्वये लगावला आहे.

मोदी सरकारने चालवला खाजगीकरणाचा घाट
विवेक नरवाडे आपल्या प्रसिद्धी म्हणतात की, सौंगध मुझे इस मिट्टी की, मै ए देश नही बिकने दूँगा हे वाक्य आपण संपूर्ण भारतीयांनी सहा वर्षापूर्वी ऐकले असेल ती तारीख म्हणजे 25 मार्च 2014. भाजपाने या वाक्याला आपले नँशनल अँन्थम बनवून लोकसभा निवडणूकीसाठी सुरु केले होते.जेव्हा मै ए देश नही बिकने दूँगा हे वाक्य आपल्या समोर येते तेव्हा देशातील मोठ-मोठ्या कंपन्या एका रांगेत आपल्या डोळ्यासमोर येतात आणि अचानक अनेक प्रश्न उभे राहतात. ते म्हणजे या कंपन्यांना विकत घेतले कोणी आणि या कंपन्यांना विकले कोणी तसेच या एवढ्या मोठ्या पैशांचे झाले तरी काय ? या सारखे अनेक प्रश्न आपल्या समोर येवून ठेपता व त्यासोबतच येतात एका पाठोपाठ एक मोठमोठ्या कंपन्या. सुदैवाने या विकल्या जाणार्‍या प्रत्येक कंपन्यांची सुरुवात ही भारत, भारतीय अथवा इंडिया या शब्दाने होते आणि याच आर्थिक फायदा देणार्‍या कंपन्या बाजारात विकण्यासाठी भाजप सरकार तयार होते. त्यातील भारतीय कोल, भारतीय संचार निगम, भारतीय पेट्रोल, एअर इंडिया या जितक्यापण कंपन्या आहेत त्या सार्वजनिक आहेत.ज्यांना या देशातील लोकांनी मोठ्या मेहनतीने, काबाडकष्ट करुन, रक्ताचे पाणी करुन उभे केले, केवळ उभेच केले नाही तर देशाच्या खजाण्यात, तिजोरीत भरमसाठ वाढ केली मात्रव् आता अशा कितीतरी कंपन्या खाजगीकरणाच्या रांगेत आसून आता त्यात भारतीय रेल्वेची भर पडली आहे. या देशाला संपविण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार मागे पुढे करायला पाहणार नाही हे यावरुन लक्षात येते, असा आरोपही नरवाडे यांनी केला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !