अग्रवाल समाजाचे अग्रोहा धामतीर्थला निर्माण होणार माता महालक्ष्मीचे भव्य मंदिर


राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग यांची माहिती

फैजपूर : अखिल भारतीय अग्रवाल संमेलनच्या महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांची ऑनलाईन बैठक नुकतीच झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग होते. ते म्हणाले की, अग्रवाल समाजाचे अग्रोहा धाम तीर्थ हरीयाणा येथे आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मातेचे मंदिर बनवायचे असून भारतातील सर्व अग्रवाल समाजातील पदाधिकारी व दात्यांनी तन, मन, धन देऊन योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले.

समाजाला करावे संघटीत
गोपाल शरण गर्ग म्हणाले की, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनचे नवीन सदस्य प्रत्येक गावा-गावातून बनवून समाजाला संघटीत करावे तसेच यावर्षी कोरोना महामारीमुळे श्री महाराजा अग्रसेन जयंती सर्वांनी घरबसल्या साजरी करावी, अखिल भारतीय अग्रवाल संमेलन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत एक हजार लहान मुलांची हृदयवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप गुप्ता, राष्ट्रीय सचिव सुमन अग्रवाल (ठाणे), मुंबई अध्यक्ष शिवकांत खेतान, महामंत्री जितेंद्र अग्रवाल (जालना), उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल (खामगाव), पंकज अग्रवाल (बुलढाणा), उपाध्यक्ष उमेश खेतान (अकोला), उपाध्यक्ष जगदीश अग्रवाल (औरंगाबाद) तसेच पुणे, लोणावळा, नाशिक, कोल्हापूर, जालना, अकोला, औरंगाबाद, नागपूर, बुलढाणा, परतवाडा, वाशीम, वर्धा, अमरावती, नांदेड, धुळे, चंद्रपूर, गोवा, हिंगोली येथील पदाधिकारी ऑनलाईन बैठकीला उपस्थित असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश प्रचारमंत्री नंदकिशोर अग्रवाल (फैजपूर) यांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !