भुसावळात भाजपातर्फे पं.दिनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ : भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने स्वर्गीय पं.दिनदयाल उपाध्याय यांना जयंती निमित्ताने शुक्रवारी अभिवादन करण्यात आले. जामनेर रोडवरील आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपाचे संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, मनोज बियाणी, प्रमोद पाटील, खुशाल जोशी, विशाल जंगले, नारायण रणधी, सुरेश कुटे, शेखर इंगळे, बिसन गोहर, प्रा.प्रशांत नरवाडे, किरण महाज, प्रा.निखील वायकोळे, दिनेश दुधाणी, देवेश कुलकर्णी, जयंत माहुरकर, धनराज बाविस्कर, दिलीप कोळी, चेतन बोरोले, अनिरुद्ध कुलकर्णी, राजु खरारे, नंदू बडगुजर, बाळु कोळी, नगरसेवक राजु नाटकर, शहर सरचिटणीस पवन बुंदेले व अमोल महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते.


