स्वामी विद्यानंद महाराज अध्यात्माचे चालते बोलते विद्यापीठच


भुसावळमधील शिष्यांच्या महाराजांविषयी भावना

भुसावळ : नाथ संप्रदायातील संत स्वामी विद्यानंद महाराज हे अध्यात्माचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने अध्यात्माच्या क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली झाल्याची भावना येथील शिष्यांनी व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. महाराजांचे 25 रोजी पुणे येथे यांनी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.

अध्यात्मिक ज्ञानाचा झरा
प्रा.डॉ. रमेश जोशी
(श्री संत गाडगे बाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ)
स्वामी म्हणजे अध्यात्म ज्ञानाचा झरा होते. त्यांनी आपल्या सोहम साधनेच्या
बळावर आत्मस्थिती पर्यंत उंची गाठली होती. ते एक आदर्श सद्गुरू, उत्तम मार्गदर्शक, आदर्श आचरण, अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व होते. त्यांनीच आम्हांला आध्यत्मिक शिकवण दिली. खरे ज्ञान दिले व जीवनाचा अर्थ समजावून दिला.

आमच्यावर अनंत उपकार 
एफ.आर.पाटील
(सेवानिवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस, भुसावळ)
माझ्यावर विद्यानंद महाराज यांचे अनंत उपकार आहेत. त्याच्यामुळेच माझे जीवन घडले. मला अध्यात्माची आवड निर्माण झाली. त्यांनी दिलेली साधना आम्ही सर्व शिष्य नित्य नियमाप्रमाणे करीत आहोत.

जगण्याचा अर्थ कळला
भास्कर भोळे (सेवानिवृत्त शिक्षक)
महाराजांनी दिलेली सोहं साधना आम्ही नित्य करीत आहोत. त्यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनामुळे आम्हांस जगण्याचा अर्थ कळला. ईश्वराविषयी अधिक प्रेम निर्माण झाले. विचारांची दिशा बदलली.

सोहम साधनेने जीवन कृतार्थ
संदिप जोशी (संचालक- एक्सेल कॉम्प्युटर, भुसावळ)
मला स्वामीजींनी गुरुमंत्र दिला आणि मी धन्य झालो. माझं जीवनच बदलून गेलं. अध्यात्माची आवड होतीच आणि त्याच्यामध्ये आता सोहम साधनेची जोड मिळाल्याने मी कृतार्थ झालो. ज्या दिवसापासून अनुग्रह घेतला एक वेगळीच शक्ती माझ्या सोबत रहायला लागली. मनुष्य जन्म आहे तेव्हा भोग तर असतीलच पण अनुग्रह मिळाल्यानंतर ते सगळं सहन करण्याची आणि तरून जाण्याची एक शक्ती मिळाली. स्वामीजींच्या अचानक जाण्याने आम्ही सर्व भक्तगण पोरके झालो.

संकटांवर मात करायला शिकवले
दिलीप झोपे (सेवानिवृत्त फॅक्टरी कर्मचारी, भुसावळ)
स्वामीजींमुळे मी जीवनातील अनेक संकटांवर मात करु शकलो. स्वामींनी मला घडविले. त्यांची ग्रंथसंपदा माझ्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे.
ते ऋषितुल्य गुरू होते. त्यांचे संपूर्ण जीवन अनुकरणीय आहे.

अध्यात्माचे चालते बोलते विद्यापीठ
सागर जोशी (महाविद्यालयीन विद्यार्थी)
स्वामी विद्यानंद हे चालते बोलते आध्यत्मिक विद्यापीठ होते. त्यांचे संपूर्ण जीवन आदर्श आहे. त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन प्रत्येकाच्या जीवनाला नवी दिशा देणारे आहे. त्यांच्या जाण्यामूळे फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रेमळ व्यक्तिमत्त्व
संजय फिरके (रेल्वे तिकीट तपासनीस,भुसावळ)
माझ्या घरी स्वामीजींचे नेहमी वास्तव्य असायचे. ते खूप प्रेमळ होते. त्यांचे विचार खूप आदर्श होते. त्यांनी शिष्यांवर भरभरून प्रेम केले.

अध्यात्मिक उन्नती होण्यास मदत
एन.आर.बढे (सेवानिवृत्त अभियंता)
मी स्वामींचा अनुग्रह घेतल्यापासून माझी खूप आध्यात्मिक उन्नती झाली. महाराज खुप दयाळू होते. त्यांनी अनेक लोकांचा उद्धार केला. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलो. त्यांची थोडीफार सेवा घडली हे माझे भाग्य आहे. त्यांच्या मार्गावरून आम्ही वाटचाल करत राहू.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !