बोदवड शहरात गटारीचे काम नित्कृष्ट ?


बोदवड : शहरात नगरपंचायतीतर्फे प्रभाग क्रमांक 16 मध्ये गटारीचे काम सुरू असून या कामामध्ये निकृष्ट दर्जाची रेती व काही भागात बिना रेतीने खडी घेसुच्या बांधकाम केले जात असल्याची ओरड होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्क्त होत आहे. गटारीचे काम करताना काही भागामध्ये अतिक्रमण काढण्यात आले तर अतिक्रमण काढण्यात आले नसल्याचा आरोप आहे. काही भागामध्ये गटारी तुंबलेल्या असून याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. काही भागात उतार तर काही भागात चढाव असल्याने त्या पद्धत्तीने गटारीचे काम होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र दक्षता न घेता काम सुरू असल्याचा आरोप आहे. निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !