यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरध्यक्षपदी हितेश गजरे


यावल : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या यावल शहराध्यक्ष हितेश गजरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी कार्यालयात हितेश गजरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, यावल युवक अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत पाटील, युवक सरचिटणीस किशोर माळी, कार्याध्यक्ष किशोर पाटील, नरेंद्र शिंदे, पवन पाटील आदी उपस्थित होते. निवडीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !