शिवपूर कन्हाळ्यात अकराशे लीटर गावठी दारूचे रसायन नष्ट
भुसावळ तालुका पोलिसांची कारवाई : एकाविरुद्ध गुन्हा
भुसावळ : भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा शिवारात गैवाजी नाल्याजवळ गावठी दारूची भट्टी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी रविवारी दुपारी कारवाई करीत गुळ, महु-नवसागर मिश्रित 6 ड्रममधील तब्ब्ल एक हजार 100 लिटर रसायण नष्ट केले तसेच तयार हातभट्टीची 30 लीटर दारू जप्त करण्यात आला. एकूण 38 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला तर या प्रकरणी ईस्माइल गवळी (रा.कन्हाळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, हवालदार प्रवीण पाटील, अमोल जाकर, हेमराज फुलसिंग आदींनी केली.

