भुसावळात 169 तर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 492 रुग्ण आढळले
24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 47 हजार 646 रुग्णांना कोरोनाची लागण
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 492 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 646 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 38 हजार 753 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 166 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी एकाच दिवशी 660 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी भुसावळात 169 तर जळगाव शहरात 147 रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.
शनिवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 147
जळगाव ग्रामीण 24
भुसावळ 169
अमळनेर 14
चोपडा 12
पाचोरा 13
भडगाव 02
धरणगाव 03
यावल 10
एरंडोल 08
जामनेर 11
रावेर 14
पारोळा 06
चाळीसगाव 41
मुक्ताईनगर 17
बोदवड 00
अन्य जिल्हा 01


