भुसावळातील तिघा कैद्यांसह दोघा कर्मचार्‍यांना कोरोना


भुसावळ  : शहरातील दुय्यम कारागृहातील तिघा कैद्यांसह दोन कर्मचार्‍यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तिघा कैद्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून दोघे कर्मचारी हे नाशिकचे असल्याने त्यांना तेथेच उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळातील दुय्यम कारागृहातील कर्मचार्‍यांसह कैद्यांचे स्वॅब घेण्यात आले होते व सोमवारी तिघा कैद्यांसह दोन कर्मचार्‍यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या कैद्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.सोमवारी कारागृहातील कैद्यांच्या सर्व रूमसह कारागृह आता आतील परीसर जेलर यांच्या मार्गदर्शनाखाली सँनेटाईज करण्यात आल्याचे सांगण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !