कुर्‍हा हरदोत विवाहितेचा विनयभंग : चौघांविरुद्ध गुन्हा


बोदवड : तालुक्यातील कुर्‍हा हरदो येथे 42 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी राहुल मधुकर माळी, विशाल मधुकर माळी, अतुल मधुकर माळी, मधुकर दामू माळी (रा.कुर्‍हा हरदो) यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुर्‍हा हरदो येथे शाळेच्या वॉल कम्पाउंडचे काम पाहण्यासाठी गेले असता तक्रारदार गेल्या असता आरोपींनी महिलेला हे वॉल कम्पाउंडचे काम बोगस आहे, असे सांगितल्याने महिलेने या कामाची गटविकास अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून घ्यावी, असे बोलल्याचा राग आरोपींना आल्याने चौघांनी शिवीगाळ केली तसेच आरोपी क्रमांक एकने विनयभंग केल्याचा आरोप आहे. तपास सहाय्यक फौजदार संजय भोसले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !