कुर्‍हा-वडोदा जिल्हा परीषद गटातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश


मुक्ताईनगर : तालुक्यातील वडोदा येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर तसेच जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या कार्य कुशलतेवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील कुर्‍हा-वडोदा जिल्हा परीषद गटातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा प्रवक्ता अ‍ॅड.विनोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर, भिकाजी असलकर, रामदास इंगळे, सोनाजी इंगळे, विश्वनाथ इंगळे, वसंत लहासे, रमेश वानखेडे, शैलेश वानखेडे, सतीश वाकोडे उपस्थित होते. दरम्यान, उखर्डा बोंबटकार, ज्ञानदेव माटे, नारायण पाटील, जयवंत लोखंडे, संतोष भगत, सुरेश कवळकार, भिका काकडे, श्रीराम गोर्‍हे, गणेश काकडे, महादेव ढेले, सुकदेव खिरडकर, विजय लोहार, देविदास दाहडे, अनिल बोंबटकर, अमोल हिवराळे, समीर इकबाल शाह, उद्दे मुस्लिम, इब्रान खान, शेख अप्सर, मंगेश चिमकर, अय्यद खान पठाण, रशीद मेंबर, अमोल शिवराठे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !