मुक्ताईनगरात केंद्राच्या शेतकरी आडमुठे धोरणाविरोधात आंदोलन


मुक्ताईनगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी आडमुठे धोरणाविरुद्धशिवसेनेतर्फे प्रवर्तन चौकात सोमवारी दुपारी 12 वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी बिल रद्द करा, अशी मागणी करण्यात आली.

हे तर व्यापारी मानसिकतेचे सरकार
भारत कृषिप्रधान देश आहे पूर्ण भारताची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे तसेच बळीराजा हा आसमानी संकटाचा सामना आजच्या परीस्थितीला करत असून देशाच्या उन्नतीला हातभार लावत आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व्यापारी मानसिकतेचे सरकार आल्याने शेतकर्‍याचे फार कंबरडे मोडले आहे. त्यातच कांदा निर्यात शेतकर्‍यांची हक्काचे बाजार पेठ, बाजार समिती खालसा करणारे विधेयक नुकतेच पारीत केले आहे तसेच परमनंट कामगार यांच्यावरदेखील कुर्‍हाड आणून देश कोणत्या मार्गावर नेत आहे हेच कळेनासे झाले आहे त्यामुळे सोमवारी शिवसेनेने जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई यांच्या नेतृत्वात शहरातील प्रवर्तन चौकात आंदोलने व निदर्शने करण्यात आली.

या मागण्यांसाठी आंदोलन
कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी, शेतकरीविरोधी कृषी बिल रद्द करावे, केळी पीक विम्याचे निकष बदलावेत, यंदा जळगाव जिल्ह्यात झालेल्या पावसाने झालेल्या नुकसान झाल्याने राज्य सरकारला केंद्राने मदत जाहीर करावी, केळीवर आलेल्या मोझॅक व्हायरसमुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, कंपनीमधील परमानंट कामगारांच्या विरोधातील कायदा रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात
आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील, शहर प्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र हिवराळे, युवा सेना उप जिल्हाप्रमुख पवन सोनवणे, राजेंद्र कांडेलकर, बाळा भालशंकर, विठ्ठल तळेले, पप्पू मराठे, गोलू मोरे, चेतन पाटील, प्रशांत भोलाणे, वसंता बनवले यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !