रावेर पोलिसांची धडक कारवाई : सहाशे लिटर गावठी दारूचे रसायन केले नष्ट


रावेर : नूतन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर सर्वत्र वॉश आऊट मोहिम सुरू करण्यात आली आहे. रावेर पोलिसांनीही खिरवड गावाजवळच्या नेहाता रोडवरील नाल्याकाठी असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकत दोघा आरोपींना अटक केली. या कारवाईत आठ हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल तुषार मोरे यांच्या फिर्यादीनुसार कुतरू कोंगे (68) व शेखर कोंगे (30, दोघे रा.खिरवड) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून गुळमोह 600 लिटर रसायन, 30 लिटर पक्के गुळमोह मिश्रीत रसायन, 400 रुपये किंमतीची 10 लिटर गावठी तयार दारू मिळून एकूण आठ हजार 800 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, हवालदार नरेकर, सुरेश मेढे, तुषार मोरे, मनोज म्हस्के, निलेश लोहार, पुरुषोत्तम पाटील, महेंद्र पाटील आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !