भुसावळातील महिलांची फसवणूक : आरोपींचा कसून शोध सुरू


भुसावळ : वृत्तपत्रातील जाहिरातीद्वारे भुसावळातील दोघा महिलांची एक लाख 89 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या भामट्यांच्या पोलिसांकडून मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोध सुरू करण्यात आला आहे. एका वृत्तपत्रात कर्ज हवे आहे का? या आशयाची जाहिरात देत महिलांनी कर्जाची मागणी केल्यावर त्यांना गट तयार करण्याच्या सूचना देत एक लाख 89 हजार रुपये उकळण्यात आले मात्र त्यानंतरही कर्ज मंजूर न झाल्याने महिलांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी पुढील तपास करीत आहे. आरोपींनी जाहिरातीमध्ये दिलेल्या क्रमांकाचा डेटा काढण्यात येत असून त्याआधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !