भुसावळात उर्दू शाळेत फॅनसह स्टेशनरी लंपास


भुसावळ : शहरातील खडका रोडवरील पालिका संचलित उर्दू शाळेतून चोरट्यांनी फॅन, स्टेशनरी, खुर्ची आदी साहित्य लांबवल्याची घटना 3 ते 8 जून या काळात घडली. या प्रकरणी मंगळवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. सध्या शाळा बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हातसफाई केली तसेच शाळेतील प्रयोग शाळेत तोडफोड करत इलेक्ट्रिक वायरींगचे नुकसान केले. मुख्याध्यापक लियाकत हुसेन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !