भुसावळात कल्याण मटका खेळताना एकास अटक


भुसावळ : शहरातील नाहाटा चौफुली जवळील पाण्याची टाकीजवळ संशयीत आरोपी नरेंद्र मोतीलाल चोरडीया (47, रा.सुरभी नगर, भुसावळ) हा कल्याण मटका खेळताना आढळून आल्याने त्यास अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी दोन वाजता ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखालीरमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख आदींनी ही कारवाई केली. तपास नाईक रमण सुरळकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !