अकलूदच्या वृद्धाची तापी नदीपात्रात आत्महत्या


यावल : तालुक्यातील अकलूद येथील 78 वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. प्रल्हाद आनंदा भालेराव असे मृताचे नाव आहे. प्रल्हाद भालेराव यांना मुखाचा कर्करोग होता. ते गेल्या काही महिन्यांपासून आजाराला खचल्याने त्यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भुसावळजवळील तापी नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. फैजपूर पोलिस ठाण्याचे हवालदार अनिल महाजन, हेमंत सांगळे यांनी धाव घेत मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. मृत प्रल्हाद यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !