हाथरस घटनेतील दोषींना फाशी द्या : मुक्ताईनगरात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
मुक्ताईनगर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित समाजाच्या 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याया घटनेचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करण्यात आला. या घटनेतील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यासंदर्भात तहसीलदार व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
पोलिस प्रशासन व सरकारचा तीव्र निषेध
तरुणीने अत्याचाराची माहिती कुणालाही देवू नये यासाठी तीची जीभ छाटण्यात आली तसेच तिच्या पाठीचा कणाही फ्रॅक्चर करण्यात आला. पोलिसांनी पीडीता व कुटुंबियांची तक्रार दाखल केली नाही मात्र जनतेने आवाज उठवल्यानंतर गुन्हा दाखल झाला तसेच तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना अंत्यसंस्काराचे अधिकार असताना पोलिस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली पीडितेच्या कुटुंबियांना घरात नजरकैद करीत त्यांना घराबाहेर निघू दिले नाही तसेच आपल्या मुलीचे अंतिम दर्शन देखील घेऊ दिले नाही व मध्यरात्री पीडीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस प्रशासन व उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या या प्रकाराचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. उत्तर प्रदेश येथील घटनेने महिला आजही सुरक्षित नाही हेच दिसून येत असून समाजात पर्यायाने महिला वर्गात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाल आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना जिल्हा प्रवक्ता अॅड.विनोद एस.इंगळे, अॅड.दीपेश वानखेडे, अमोल बोदडे, शैलेश वानखेडे, मोहन मेढे, राहुल गणेश, आकाश इंगळे, दीपा वाघ उपस्थित होते.

