मुक्ताईनगरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा जाळला पुतळा
मुक्ताईनगर : उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस हायवेवर काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात काँग्रेस पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा पुतळा जाळला. उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेनंतर भेट देण्यासाठी खासदार राहुल गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखले व त्यांना धक्काबुक्की केली. ही घटना अत्यंत घृणास्पद असून देशात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केला जात असून उत्तर प्रदेशातीलल योगी आणि केंद्रातील मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे मुक्ताईनगर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधात जोदार घोषणाबाजी करत योगी यांचा पुतळा जाळण्यात आला.

