केंद्राचे कृषी विधेयक शेतकर्यांच्या हिताचे : खासदार रक्षा खडसे
रावेर : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक शेतकरी हिताचे व त्यांचा सन्मा उंचावणारे असल्याचे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी येथे केले. भाजपच्या रावेर तालुका शाखेतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता, राष्ट्रपुरुष महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभपती श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय धांडे, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर उपस्थित होते.

विधेयकाने व्यापार्यांची मोनोपॉली मोडीत
खासदार म्हणाल्या की, पूर्वी व्यापार्यांची मोनोपॉली झालेली होती त्यामुळे शेतकर्यांना व्यापार्यांच्या मर्जीप्रमाणे शेती मालाची विक्री करावी लागत होती मात्र या विधेयकाने ही पद्धत मोडीत निघणार आहे. शेतकर्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभ्या कराव्यात त्यातून अधिक लाभ होऊ शकेल, असे आवाहन खासदार खडसे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष भोळे यांनी भाजप सत्तेसाठी नाही तर समाजसेवेसाठी कार्य करत असल्याचे सांगत शेतकर्यांच्या हिताचे कृषी विधेयक मंजूर केल्याने केंद्र सरकार व खासदार रक्षा खडसे यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रत्येक गावातून करावा, असे ते म्हणाले. पक्षात काम करीत असतांना स्वतःकडे असलेल्या पदाला योग्य न्याय देता येत नसेल तर पद घेवू नका, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.
यांची मेळाव्यास उपस्थिती
शेतकरी मेळाव्यास महिला तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, नंदकिशोर महाजन, पंचायत समितीचे सभापती जितू पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, योगीता वानखेडे, धनश्री सावळे, कविता कोळी, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, गोपाळ नेमाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजन लासूरकर तर आभार महेश चौधरी यांनी मानले.

