सोनगीर पोलिसांनी अवैध मद्याची वाहतूक रोखली : दोघांना अटक
सोनगीर : सोनगीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आयशर वाहनातून अवैधरीत्या मद्याची होणारी वाहतूक रोखत दोघांना अटक केली. चालक मुकेश वरद जयस्वाल (27, सुयोगनगर, गांधी पॅलेस, इंदूर), सहचालक फारुख जफार शेख (20, रा 101, शिरपूर काकड सागर पॅलेस, इंदूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी वाहनात लपवलेला मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची मद्यसाठ्याची महाराष्ट्रातील किंमत सुमारे 20 लाख 16 हजार 720 रुपये आहे. मसोनगीर पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रकाश पाटील व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक नामदेव सहारे, शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

