किसान रेलच्या माध्यमातून पाच हजार 223 टन मालाची वाहतूक
भुसावळ : भारतातील पहिली किसान रेल्वे 07 ऑगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर दरम्या चालवण्यात आली तर आता देवळाली व मुजफ्फरपूर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. किसान रेलला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंतच्या 19 फेर्यांच्या माध्यमातून पाच हजार 223 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. डाळिंब, कॅप्सिकम, हिरव्या मिरच्या, आले, लिंबू, आइस्ड फिश यासारख्या वस्तूंची वाहतूक केली जात आहे. डाळींब 2039 टन, मिक्स भाज्या 1303 टन व इतर वस्तूंची वाहतूक करण्यात आली. सोलापूर विभागातील सांगोला, मोडलिंब, बेलावंडी, बेलापूर आणि कोपरगाव स्थानकावर पीओएस मशीन बसविल्यामुळे किसान रेलमध्ये कृषी माल बुक करण्यासाठी एक नवीन सुविधादेखील सुरू करण्यात आली असून ज्यामुळे व्यवसायाची सुलभता आणि त्वरीत व्यवहार आणि वेळेची बचत होत आहे.

