जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 276 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 49 हजार 711 वर : 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी 276 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 49 हजार 711 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 02 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1206 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 44 हजार 302 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, सोमवारी एकाच दिवसात तब्बल 501 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील बाधीतांपेक्षा बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 73
जळगाव ग्रामीण 11
भुसावळ 31
अमळनेर 10
चोपडा 06
पाचोरा 01
भडगाव 01
धरणगाव 03
यावल 03
एरंडोल 05
जामनेर 106
रावेर 10
पारोळा 00
चाळीसगाव 08
मुक्ताईनगर 02
बोदवड 00
अन्य जिल्हा 06




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !