हाथरस घटनेतील आरोपींना फाशी द्यावी : बोदवड शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन


बोदवड : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा बोदवड शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पीडितेने नऊ दिवस मरण यातना सहन केल्याने अखेर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर पीडित मुलीचा मृतदेह घरच्यांना न देता परस्पर पोलिस प्रशासनाने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार उरकल्याने या बाबीला जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन तहसिलदार हेमंत पाटिल यांना देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, माजी शहरप्रमुख आतिष सारवान, अल्पसंख्यांक जिल्हा उपसंघटक कलिम शेख, गोपाळ पाटील, धनराज पाटील, अमोल व्यवहारे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !