छोट्या व्यावसायीकांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत दुकानांना द्यावी परवानगी


भुसावळातील वंचित बहुजन आघाडीची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

भुसावळ : भुसावळ शहरात लॉकडाऊन नंतर छोट्या व्यावसायीकांना सायंकाळी सात वाजेपर्यंत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने दुकाने खुली ठेवण्याची परवानगी आहे मात्र लॉकडाऊन काळात व्यावसायीकांचे मोठे नुकसान झाल्याने या व्यावसायीकांना रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या नेतृत्वात प्रांताधिकार्‍यांना निवेदन देवून करण्यात आली.

व्यावसायीक कामगारांवर उपासमारीची वेळ
निवेदनाचा आशय असा की, सायंकाळी सात वाजेनंतर दुकाने बंद होत असल्याने पाहिजे तसा व्यवसाय होत नसल्याने व्यावसायीक तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. शहरातील आईस्क्रीम, पाणीपुरी, चायनीज पदार्थ विक्री करणारे विक्रेते तसेच पावभाजी, मसाला डोसा विक्री करणार्‍या विक्रेत्यांना सायंकाळी सात ऐवजी रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने खुल ठेवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विविध व्यावसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !