यावल तहसीलदार महेश पवार यांनी पदभार स्वीकारला


यावल : कोरोना  विषाणु संसर्गाच्या संकट काळात शासन पातळीवरील विविध आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची जळगाव संजय गांधी निराधार योजना विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कळवण, जि.नाशिक येथील रहिवासी अहमदनगरचे तहसीलदार महेश कौतीकराव पवार यांची बदली करण्यात आली होती. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. प्रशासकीय कामकाज पारदर्शीपणे करण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कुंवर यांनी यावलच्या सेवाकार्यात मिळालेली माणसं व आपुलकी प्रेम व सहकार्य हे सदैव आपल्या हृदयात राहणार असल्याचे सांगुन आपल्या कार्यकाळात यावलकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासुन आभारी असल्याचे सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !