आमदारांसह नगराध्यक्षांच्या घरासमोर आता आंदोलन


वंचित बहुजन आघाडीचा इशारा : घरकुलासाठी होतेय भटकंती

भुसावळ : शहरात गेल्या तीन वर्षापासून संथ गतीने अमृत योजनेचे काम सुरू असल्याने नागरीकांना होणारा मनस्ताप तसेच पंचशील नगरातील दलित वस्तीतील अनेक गरजू लाभार्थींना गेल्या अनेक दिवसांपासून घरकुल मिळविण्यासाठी नगरपालिकेत चकरा माराव्या लागत असून घरकुलासाठी अर्ज केल्यानंतरही यातील अनेक प्रकरणे जवळपास वर्ष दोन वर्षापासून प्रलंबित असल्याने आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या निवासस्थानासमोर 19 ऑक्टोबर रोजी निदर्शने व मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

प्रशासनाला दिले निवेदन
आंदोलनासंदर्भात मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना मागण्यांबाबत लेखी निवेदन देण्यात आले. घरकुलासाठी लाभार्थी पालिकेतील बांधकाम विभागात सातत्याने चकरा मारत असून त्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. भुसावळ शहरातील पंचशील नगर भागातील शौचालयांची झालेली दुरावस्था तसेच पिण्याचे पाणी यासह विविध समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, देवदत्त मकासरे, जिल्हा सचिव संजय सुरडकर, दीपक सुरवाडे, पंकज बोदडे, प्रणव सुरवाडे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !