कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक : यावल पोलिसांनी पकडला ट्रक


नऊ गुरांची सुटका : आयशर चालकासह क्लीनरविरुद्ध गुन्हा

यावल : तालुक्यातील सांगवी गावाजवळ युवकांच्या जागृतेने कत्तलीच्या उद्देशाने गुरेढोरांची वाहतुक करणारा ट्रक यावल पोलिसांनी पकडला असून याबाबत पोलीसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस सुंत्रांकडून मिळालेली माहीती अशी की आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास फैजपूर यावल मार्गावरील सांगवी गावाजवळ टाटा आयशर एमएच 06 एजी 7689 या चार चाकी वाहनातुन सावदा येथुन चोपडा येथे कत्तलीच्या उद्देशाने वाहनात अत्यंत निर्दयीपणे कोंबुन गुरा-ढोरांची वाहतुक करण्यात येत असल्याची माहीती काही जागृत युवकांकडुन मिळताच पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना मिळताच यावल पोलीसांनी तात्काळ सांगवी गावाजवळच्या मार्गावर असलेले ट्रक व त्यातील 9 जनावरांची सुटका केली. याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये वाहन चालक शेख मुजाहीद शेख रज्जाक (रा.चोपडा) व क्लिनर शेख मुश्तका शेख बिस्मिल्ला (चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !