रोटरी क्लब ऑफ भुसावळचा गव्हर्नर रोटेरीयन शब्बीर शाकीर यांनी घेतला आढावा
क्लबचे नूतन अध्यक्ष गजानन ठाकूर यांच्या उपक्रमांचे कौतुक
भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ 3030 ची वार्षिक तपासणी रोटरीचे गव्हर्नर शब्बीर शाकीर यांनी ऑनलाईन केली. रोटरी क्लब भुसावळ क्लबची ऑनलाईन डीजी भेट नुकतीच झाली. रोटेरीयन शब्बीर शाकीर यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष गजानन ठाकूर, सचिव डॉ.गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष इलेक्ट्रो रोटेरियन राजेंद्रकुमार फागडे, कोषाध्यक्ष शुक्ला, सहा.राज्यपाल रोटरीयन धर्मेंद्र मेंडकी यांच्यासमवेत क्लबची बैठक घेतली. गव्हर्नर रोटेरीयन शब्बीर शाकीर यांनी अध्यक्ष गजानन ठाकूर यांच्याकडून आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा जाणून घेत रोटरी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक केले. गजानन ठाकूर यांचे विशेष कौतुक त्यांनी केले.
यांनी केला अहवाल सादर
रोटेरियनचे अध्यक्ष गजानन ठाकूर यांनी त्यांच्या कार्याचे लेखापरीक्षण सादर केल्यानंतर कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डॉ.नारायण अरवीकर, शब्बीर शाकीर, डॉ.माया अरवीकर, प्रदीप दवे, वर्गीकरण समितीचे अध्यक्ष रोटेरियन सतीश अग्रवाल तसेच फेलोशिप कमिटीचे अध्यक्ष रोटेरीयन अरुण मंडलकार व क्लब बुलेटीनचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शुक्ला यांनी आपला अहवाल सादर केला. सहा.राज्यपाल धर्मेंद्र मेंडकी यांनी आभार मानले.


